वत शेकटीचा
स्त्री शिक्षणासा
कामठीः ‘सावित्रीच्या लेकींचा’ सत्कार करताना अॅड. कुंभारे. ■ सकाळ वृत्तसेवा
कामठी, ता. ४ : महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई
फुले यांनी कष्टाने व विपरीत परिस्थितीत मुलींच्या शिक्षणाची दारे उघडलीत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शाळेतील पहिली शिक्षिका म्हणून आदर्श निर्माण केला. वर्तमानात मुलांच्या बरोबरीने मुली शिक्षण घेऊन समाजामध्ये सन्मानाचे स्थान प्राप्त करून घेत आहेत. हा इतिहास घडविणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समाजामध्ये रूजविण्याची गरज असल्याची भावना अॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केल्यात. त्या हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.
हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुबिना अंसारी, प्रा. बोरकर, अधिव्याख्याता, सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकिरण येवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. फरहीन कौसर, मेडीकल ऑफिसर, हेल्थ सर्वांसेस, नंदिनी एकनाथ बावनकुळे, धनश्री रामराव उईके, अरीबा फातमा यांचा ‘सावित्रीची लेक’ म्हणून सत्कार करण्यात आला. संचालन विनोद जुमळे व विशाखा पाटील यांनी केले. प्रास्ताविक हरदास विद्यालयाचे मुख्याध्यापक देवेंद्र जगताप व आभार ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका अंबरीन फातीमा यांनी मानले.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.